Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधार नसले तरी आवश्यक सुविधा मिळणार

आधार नसले तरी आवश्यक सुविधा मिळणार
आधार कार्ड नसले तरीही आवश्यक सुविधांपासून सर्वसामन्यांना वंचित ठेवता येणार नसल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने स्पषट केले आहे. त्यासंबंधीचे निवेदन पत्र सर्व राज्य सरकार, सरकारी विभाग आणि मंत्रालयानांही पाठविण्यात येत असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
 
आधार क्रमांक नसल्यास किंवा बुद्धत्वामुळे बायोमेट्रिक्स न मिळाल्यास अशा कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्यांना आवश्यक सुविधा देण्यापासून रोखता येणार नाही, असे आधार कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आल्याचेही यूआयडीएआयने म्हटले आहे.
 
अनेक गरजूंना आधार नसल्याने आवश्यक सुविधा नाकारण्यात आल्याच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे यूआयडीएआयने म्हटले आहे. आधार नसल्यामुळे कर्मचार्‍यांकडून हॉस्पिटलमध्ये भरती न करुन घेण्याच्या प्रकरणांमुळे सर्वसामान्यांना खूप त्रास होत असून अशा प्रकणांमागील नेमके कारण काय आहे याचा तपास सुरु आहे. जिथे कुठे अशा घटना घडल्या आहेत, तिथे दोषींवर कठोर कारवाई केली गेली असल्याचेही यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन