Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील 2 बँकांवर कारवाई

महाराष्ट्रातील 2 बँकांवर कारवाई
, शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (21:09 IST)
आरबीआयने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सहकारी बँकावर धडक करावाई केली आहे. महाराष्ट्रातील 2 बँकांसह 5 को ऑपरेटिव्ह बँकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना पैसे काढण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निवेदनात म्हणले आहे की या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने सुरू राहतील. 
 
 या पाच बँकांमध्ये HCBL सहकारी बँक, लखनऊ, आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद आणि कर्नाटकातील शिमशा सहगारी बँक नियामिथा, मद्दूर, मंड्या जिल्ह्यातील ग्राहक सध्याच्या तरलतेच्या संकटामुळे त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकत नाहीत. त्याचबरोबर उरावकोंडा को ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकचे ग्राहक 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिव ठाकरे-राज ठाकरे भेट