Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड जोडा, नाही तर बॅंक अकाउंट बंद

Add Bank Account with PAN Card
बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड जोडणी नसेल केली तर 28 फेब्रुवारीपर्यंत करून घ्या अन्यथा तुमचं बॅंक अकाउंट बंद केलं जाण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांचे बॅंक अकाउंट  28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डसह जोडलेले नसतील ते गोठवले जाऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे.   आयकर विभागाच्या निर्देशानंतर सर्व बॅंकांनी आपल्या ग्राहकांना 28 फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. ज्यांच्याकडे पॅनकार्ड नसेल ते बॅंकेत जाऊन 60 नंबरचा फॉर्म भरू शकतात. जनधन खातं आणि झीरो बॅलेन्स अकाउंट असणा-यांसाठी पॅनकार्डची माहिती देणं बंधनकारक नसणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुकचे ऑटो प्ले व्हिडीओ हे नवे अपडेट