Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंद होऊ शकते ही बँक, पैसा काढा नाहीतर येऊ शकतं संकट

बंद होऊ शकते ही बँक, पैसा काढा नाहीतर येऊ शकतं संकट
, मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (12:48 IST)
आयडिया पेमेंट्स बँक (Idea Payments Bank) च्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आदित्य बिडला आयडिया पेमेंट्स बँक आपला व्यवसायात ऐच्छिक लिक्विडेशन घेत आहे. अर्थातच लवकरच बँक बंद होणार आहे. अशात ग्राहकांना त्रास सहन करावा लागू शकतो.
 
या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की कंपनीने आपल्या इच्छेने आपला व्यवसाय बंद करण्याचा आवेदन केला आहे. आवेदन केल्यानंतर लिक्विडेशन मंजूर करण्यात आले आहे.
 
जुलै 2019 मध्ये आदित्य बिडला आयडिया पेमेंट्स बँकेने घोषणा केली होती की ते लवकरच व्यवसाय बंद करणार असून ग्राहकांनी आपलं बँलेंस ट्रांसफर करून घ्यावं. वेळेवारी पैसा काढला नाही तर पैसा अडकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
व्यवसाय कोसळण्याची कारणे म्हणजे कंपनीने अप्रत्याशित घटनाक्रम अंतर्गत व्यवसायाचे अव्यावहारिक असणे सांगितले होते. आतापर्यंत पेमेंट बँकिंग मार्केटमध्ये टेक महिंद्रा, चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनेंस कंपनी आणि दिलीप सांघवी, आयडीएफसी बँक लिमिटेड आणि टेलिनॉर फायनेंशल सर्व्हिसेजच्या युतीत तयार पेमेंट बँक मार्केट सोडण्याची घोषणा करून चुकलेले आहेत.
 
ऑगस्ट 2015 मध्ये आयडिया पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लायसेंस मिळाले होते. नंतर एप्रिल 2016 मध्ये आदित्य बिडला आयडिया पेमेंट्स बँक सुरू केले गेले होते. ही बँक आदित्य बिडला नुवो आणि आयडिया सेल्युलर दोघांचे संयुक्त उपक्रम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गौतम गंभीर यांचा पलटवार, नेहमीसाठी सोडून देईन जिलेबी खाणे...