भारतातच नव्हे तर दुनियाभरात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जादू दिसून येत आहे. अमेरिकेतील सर्व्ह एजेंसी प्यू यांनी मोदींना सर्वात लोकप्रिय नेता घोषित केल्यानंतर मूडीजने देखील भारताच्या वाढत असलेल्या प्रभावाला स्वीकारले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत अमेरिकन एजेन्सी 'मुडीज'ने तब्बल 13 वर्षांनंतर भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. एजेन्सीने भारताचे रेटींग बीएए 3 वरून बीएए 2 असे केले आहे. मुडिजने भारताचे क्रेडिट रेटिंग वाढण्याचे श्रेय आर्थिक सुधारणांना दिले आहे. २००४ मध्ये मुडिजने भारताला बीएए 3 रेटिंग दिले होते.
2015 मध्ये संस्थेने भारताची क्रेडिट रेटिंगला स्थिर हून वाढवून सकारात्मक केले होते. तसेच बीएए 3 हा सर्वात कमी दर्जाचा इन्व्हेस्टमेंट ग्रेड समजला जातो.