Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअरटेलचे देशातील पहिली पेमेंट बँक

एअरटेलचे देशातील पहिली पेमेंट बँक
एअरटेल या मोबाईल कंपनीने डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू केली असून देशातील ही पहिली पेमेंट बँक ठरली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून पेमेंट बँकेचा लाइसेंस मिळवणारी ही पहिली कंपनी आहे. राजस्थानमधून भारती एअरटेलने प्रायोगिक तत्त्वावर ही बँक सुरू केली आहे. 
 
सध्या राजस्थानमधील शहरे आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना एअरटेल रिटेल आउटलेटमध्ये जाऊन बँकेत खातं उघडता येणार असून राज्यातील १० हजार रिटेल आउटलेट्सच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना पेपरलेस खाते उघडण्यासाठी आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने 'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
 
या बँकेतील बचत खात्यातील रकमेवर ७.२५ टक्के या दराने व्याज देण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज देण्याची ही पहिलीच वेळ आहे, यापूर्वी अनेक बँकांनी ४ टक्क्यांपर्यंत व्याज दिले आहे. 
कसे काम करतं पेमेंट बँक
या बँकेतून सामान्य बँकेप्रमाणे पैसे काढले जाऊ शकतात परंतू याची सीमा निर्धारित आहे. या बँकेचे एटिएम किंवा डेबिट कार्ड जारी केले जाणार नाही परंतू निर्धारित एअरटेल रिटेल आउटलेट्सवर कॅश काढण्याची सुविधा देण्यात येईल. पेमेंट बँकेत ग्राहक अधिकतम 1,00,000 रुपये जमा करवू शकतात.
 
ग्राहकांचा एअरटेलचा मोबाइल नंबरच त्यांचा खाता असेल. आधार कार्डाद्वारे आपण एअरटेल आउटलेटवर पेमेंट बँक खाता उघडू शकता. यात नॉन एअरटेल कस्टमरही सामील होऊ शकतात. यासाठी दहा डि‍जीट नंबर देण्यात येईल. ज्याच्या मदतीने रक्कम डिपॉझिट किंवा विथड्रा केली जाऊ शकते.
 
आपण या अकाउंटने देशातील कुठल्याही बँकेच्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर करू शकता. प्रत्येक खात्यावर एक लाख रुपय्यांचा अपघात विमा देण्यात आला आहे.
 
एअरटेल कस्टमर असे उघडवू शकतात खातं
एअरटेलचे ग्राहक या सुविधेचा लाभ आपल्या मोबाइल फोनने *400# किंवा 400 यावर कॉल करून सुरू करू शकतात. ग्राहकांची सुविधा म्हणून ही सेवा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत सुरू केली गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बठिंडा येथे नरेंद्र मोदी यांची रॅली ...