Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘अमेझॉन इंडिया’कडून 7 हजार 500 हंगामी नोकर भरती

‘अमेझॉन इंडिया’कडून 7 हजार 500 हंगामी नोकर भरती
, सोमवार, 16 जानेवारी 2017 (17:07 IST)
अमेझॉननेही नव्या वर्षातल्या पहिल्या  सेलसाठी ‘अमेझॉन इंडिया’ने भारतात तब्बल 7 हजार 500 जणांची हंगामी नोकरीसाठी भरती केली आहे.

अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन सेल’ 20 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 22 जानेवारीला रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु असेल. अमेझॉनच्या देशभरातील 27 सेंटर, 100 हून अधिक डिलिव्हरी स्टेशन आणि 15 सॉर्ट सेंटर्सवर या भरती केलेल्यांना प्रशिक्षण दिले  आहे. पुढेही अमेझॉनसोबत काम करण्याची संधीही असेल, अशी माहिती अमेझॉन इंडियातील इंडिया कस्टमर फुलफिलमेंटचे मुख्य अखिलेश सक्सेना यांनी दिली.

लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी या विभागांवर अमेझॉनने अधिक भर देण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन अमेझॉनवरुन कोणतंही प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत अधिकाधिक लवकर पोहोचवता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिलात सेवाकर दाखवणे बंधनकारक