आनंद महिंद्रा यांनी एक मजेशीर फोटो ट्विट केला असून यामध्ये अंड्याने भरलेली एक व्हॅन दिसत आहे. तर अंड्याचे ट्रे गाडीतून खाली पडू नयेत म्हणून एक मुलगा त्यासमोर बसल्याचे यामध्ये दिसते आहे.
आता एरवी सामान वाहून नेताना टेम्पो किंवा ट्रकमध्ये रस्सीने बांधले जाते. पण या टेम्पोला असलेल्या जादाच्या चाकावर एक मुलगा अतिशय हास्यास्पद पद्धतीने बसलेला दिसतो. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये महिंद्रा कंपनीच्या भारतातील डिझाईन टीमला टॅग केले आहे. गाडीला जास्तीचे चाक लावताना भारतात ग्राहक प्रत्येक गोष्टीचा कसा वापर करतात हे आपल्याला लक्षात घेऊन गाडीचे डिझाईन तपासायला हवे. त्यामुळे काहीतरी हटके आणि सहज अंदाज बांधता येणार नाही असे काहीतरी डोक्यात ठेवा असा सल्लाही दिला आहे.