Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 February 2025
webdunia

पीएम केअर फंडच्या विश्वस्तपदी रतन टाटा यांची नियुक्ती

ratan tata
, गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (12:55 IST)
केंद्र सरकारने पंतप्रधान केअर फंडच्या विश्वस्तपदी उद्योगपती रतन टाटा यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने नुकतीच यासंदर्भात माहिती जाहीर केली.
 
रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 
शिवाय, पीएम केअर फंडच्या सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली आहे.
 
यात कॅगचे माजी अध्यक्ष राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती आणि इंडिया कॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद शहा यांची निवड करण्यात आली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (20 सप्टेंबर) पीएम केअर फंडचे नवीन विश्वस्त मंडळ आणि सल्लागार समितीसोबत चर्चा केली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
 
समितीच्या नवीन सदस्यांमुळे पीएम केअर फंडच्या कामकाजाला व्यपक दृष्टीकोन मिळेल असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात सर्वाधिक महिला मद्यपी धुळे जिल्ह्यात तर पुरुष मद्यपी गडचिरोली जिल्ह्यात