Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एटीएमचा पिन बदलावाच लागणार

राष्ट्रीय बँक एस बी आय
, गुरूवार, 20 ऑक्टोबर 2016 (20:37 IST)
राष्ट्रीय बँक एस बी आय सोबत इतर खासगी असलेल्या बँका मधील ऐकूण ३२ लाख ग्राहकांचा डेबिट कार्ड डेटा चोरी झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बँकांनी ग्राहकांना सावधता म्हणून एटीएमचा पीन बदलण्यास सांगितले आहे. काल एसबीआयने ६ लाख पेक्षा अधिक असे डेबिट कार्ड स्वतः ब्लॉक केले होते.  आता एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस बँकेनेही हे पाऊल उचलले आहे.
 
या कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारांसाठी होत असल्याची शंका आल्याने बँकांनी हे पाऊल उचलले आहे. तर हा इतका गोपनीय डाटा चोरीस गेलाच कसा असा प्रश्न आता ग्राहक विचारू लागले आहेत.सणासुदीच्या दिवसात कोणाचेही नुकसान नको म्हणून बँकांनी हे पाऊल उचलेले असून आपल्या क्रेडीट आणि डेबिट कार्डची माहिती कृपया कोणास देऊ नका आणि फोनवर ही माहिती कोणाला सांगू नका अशी विनंती बँकांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हर्टीकल स्टुडीओचे आयोजन, किफायतशीर घरे