Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्षात ATM चे नियम बदलणार, 31 डिसेंबरला नवी नियमावली येणार

नवीन वर्षात ATM चे नियम बदलणार, 31 डिसेंबरला नवी नियमावली येणार
, शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (10:39 IST)
सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे ATM बद्दलचे नियम बदलणार आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे.

त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अॅप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने निगराणी राखावी. महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.
 
सोबतच शॉपिंगसाठी नव्या कार्डसोबतच आरबीआयने प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट (PPI) लाँच करण्याची घोषणाही केली आहे. याचा वापर 10 हजार रुपयांपर्यंतचं सामान किवा सेवा खरेदी करण्यासाठी करता येईल.याबाबत अधिक माहिती 31 डिसेंबर 2019 पर्यंत दिली जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फुलपाखरे झाली मराठी, जवळपास तीनशे फुलपाखरांची नावे बदलली