Audi Q8 e-tron :भारतीय बाजारपेठेत एकाहून अधिक इलेक्ट्रिक कार सतत लॉन्च केल्या जात आहेत. दरम्यान, जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी ऑडीने आज आपला वाहनपोर्टफोलिओ अपडेट करत नवीन इलेक्ट्रिक कार ऑडी Q8 ई-ट्रॉन लाँच केली आहे.
आकर्षक लुक आणि पॉवरफुल बॅटरी पॅकने सजलेल्या या कारचे स्पोर्टबॅक व्हर्जनही लाँच करण्यात आले आहे एकूण 4 प्रकारांमध्ये येणाऱ्या या कारचे बेस मॉडेल 1.14 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनीने त्याचे अधिकृत बुकिंग देखील सुरू केले आहे, ज्यासाठी ग्राहकांना 5 लाख रुपये जमा करावे लागतील.
नमूद केल्याप्रमाणे, ऑडी Q8 ई-ट्रॉन दोन वेगवेगळ्या बॉडी प्रकारांमध्ये ऑफर केली गेली आहे, एक एसयूव्ही आवृत्ती आणि दुसरी स्पोर्टबॅक ही कार एकूण 9 बाह्य आणि तीन अंतर्गत शेडमध्ये उपलब्ध असेल. बाह्य रंगांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक मडेरा ब्राउन, क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाइट, मायथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅनहॅटन ग्रे यापैकी निवडू शकतात. आतील थीममध्ये ओकापी ब्राउन, पर्ल बेज आणि ब्लॅक रंगांचा समावेश आहे.
ऑडी Q8 ई-ट्रॉनची वैशिष्टये -
कंपनीने या कारच्या एक्सटीरियरला कमी कॉस्मेटिक अपडेट्स दिले आहेत, तरीही ऑडीने डिझाइनमध्ये मोठ्या प्रमाणात नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रिलला का.काळ्या सभोवताली नवीन मॅश चे डिझाइन तसेच एक नवीन लाइट बार दिले आहे जो किंचित सुधारित हेडलॅम्पला पूरक आहे. ऑडीचा नवीन 2D लोगो Q8 e-tron मध्ये देखील देण्यात आला आहे जो घन पांढर्या रंगात येतो. पुढील आणि मागील बंपरला अधिक आक्रमक शैली देण्यात आली आहे आणि पुढचा भाग आता चमकदार काळ्या रंगात दिले आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीने नवीन डिझाईनचे 20-इंच अलॉय व्हील दिले आहेत, जे पूर्वी देखील उपलब्ध होते.
मध्यवर्ती कन्सोलवर ड्युअल-टचस्क्रीन सेटअपसह, SUV चे आतील भाग पूर्वी सारखेच राहतात, ज्यामध्ये इंफोटेनमेंट सिस्टमसाठी 10.1-इंच स्क्रीन आणि HVAC नियंत्रणांसाठी 8.6-इंच स्क्रीन आहे.
यात ऑडीच्या व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, 16-स्पीकर बँग आणि ओल्फ़सेन स्पीकर सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरासह ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील दिले आहे.
कंपनीने ऑडी Q8 ई-ट्रॉन दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केले आहे. एका व्हेरियंटमध्ये 95kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो जो 340bhp पॉवर आणि 664Nm टॉर्क जनरेट करतो. तर दुसरा बॅटरी पॅक 114kWh चा आहे, जो 408bhp पॉवर जनरेट करतो. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये 600 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे.170 kW क्षमतेच्या DC फास्ट चार्जरच्या मदतीने त्याची बॅटरी अवघ्या 31 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते.