Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बजाजची जगातील पहिली CNG बाईक लाँच, किंमत जाणून घ्या

बजाजची जगातील पहिली CNG बाईक लाँच, किंमत जाणून घ्या
, शुक्रवार, 5 जुलै 2024 (16:41 IST)
बजाजचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात साकार झाले आहे. बजाज जगातील पहिली सीएनजी बाईक जगासमोर सादर झाली आहे. लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आंणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
 
बाईकची शुरुवातीची 95 हजार रुपये(एक्स शोरुम) आहे. त्याला लहान व्हिझरसह गोल हेडलाइट मिळते.  सपाट, सिंगल-पीस सीट याला अधिक प्रवाशांसारखा अनुभव देते.बाईक पेट्रोल टाकी तसेच त्याखालील CNG सिलिंडरसह सुसज्ज आहे. नवीन CNG बाईक पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालू शकणाऱ्या नवीन 100cc-125cc इंजिनसह सुसज्ज आहे.
 
बाईक मध्ये विभागातील सर्वात लांब सीट दिली आहे. ही समोरील इंधन टाकीला कव्हर करते.या सीटखाली सीएनजी टाकी ठेवण्यात आली असून हिरवा रंग सीएनजी आणि नारंगी रंग पेट्रोलचे दर्शवते.
बाईकला मजबूत ट्रेलीस फ्रेम देण्यात आली आहे. या मुळे बाईक हलकी आणि मजबूत होते.

बाईक 11 चाचण्यांमधून उत्तीर्ण झाली असून पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. बाईकला समोरून,बाजूने, वरून ट्रक खालून चिरडून चाचणी घेण्यात आली असून बाईक सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. बाईकचे इंजिन 9.5PS पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करते. या मध्ये कंपनीने 2 लिटर पेट्रोल इंधन टाकी आणि 2 किलो क्षमतेची सीएनजी टाकी दिली आहे. बाईक पूर्ण टाकी मध्ये पेट्रोल +सीएनजी 300 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्याचा दावा केला आहे. 

या बाईकचे कंपनीने एकूण 3 व्हेरियंट सादर केले आहे. बाईक डिस्क ब्रेक आणि ब्रेक ब्रेकिंग सिस्टमसह येत आहे. बाईक 7 रंगामध्ये उपलब्ध आहे.  कॅरिबियन ब्लू, इबोनी ब्लॅक-ग्रे, प्युटर ग्रे-ब्लॅक, रेसिंग रेड, सायबर व्हाईट, प्युटर ग्रे-येलो, इबोनी ब्लॅक-रेड रंग येत आहे.  
 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा