Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बजाजची वेंजर स्ट्रीट 160 झाली महाग

बजाजची वेंजर स्ट्रीट 160 झाली महाग
, बुधवार, 22 जुलै 2020 (21:15 IST)
कोरोना संकट आल्यानंतर गाड्यांची विक्री कमी झाली आहे. चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची विक्री कमी झाली असली तरी काही कंपन्यांनी दुचाकीच्या किमतीत वाढ केली आहे. बजाज ऑटोने आपली Bajaj -venger Street 160 महाग केली आहे.
 
बजाज ऑटोची एन्ट्री लेवल क्रूझर बाइक Bajaj -venger Street 160 महाग करण्यात आली आहे. कंपनीने या बाइकच्या किंमतीत 1 हजार रुपयांची वाढ केली आहे. एक हजार रुपयांच्या वाढीनंतर आता venger Street 160 160 ची किंमत 95 हजार 891रुपये झाली आहे. अव्हेंजर स्ट्रीट 160 चे बीएस6 मॉडेल या वर्षी एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले होते. यानंतर दुसर्यांरदा या बाइकच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
 
ब्रेकिंग आणि सस्पेंशन 
अव्हेंजर स्ट्रीट 160च्या फ्रंटमध्ये 280 mm डिस्क आणि मिररमध्ये 130 mm ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. बाइक सिंगल चॅनेल-इड (एंट्री-लॉक ब्रेकिंग सिस्टम) देण्यात आले आहे. सस्पेंशनमध्ये फ्रंटला टेलेस्कोपिक फोर्क आणि मिररमध्ये 5 स्टेप अजस्टेबल टि्वन शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन देण्यात आले आहेत. अव्हेंजर स्ट्रीट 160 चे वजन 156 किलोग्रॅम आहे. बजाजची ही क्रूझर बाइक दोन रंगात म्हणजेच ब्लॅक आणि रेड रंगात उपलब्ध आहे.
 
सर्वात स्वस्त क्रूझर बाइक किंमत वाढल्यानंतर सुद्धा अव्हेंजर स्ट्रीट 160 देशातील सर्वात स्वस्त एंट्री लेवल क्रूझर बाइक बनली आहे. अव्हेंजर स्ट्रीट 160 शिवाय बजाजने आपल्या  जवळपास सर्वच मोटरसाकलच्या किंमतीत वाढ केली आहे. ज्यात पल्सर 150, पल्सर NS200, पल्सर 180F, CT100, CT110 आणि प्लॅटिना 100 यासारख्या बाइकचा समावेश आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंध्र प्रदेश सरकारचा 5 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याचा विचार