बदलू शकतो बँका उघडण्याच्या वेळा! जाणून घ्या काय असेल नवीन वेळ

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (14:21 IST)
जास्तकरून लोक बँकांशी निगडित काम करण्यासाठी बँका उघडण्याची वाट बघत बसतात. जास्त करून सर्व पब्लिक सेक्टर बँक (PSU) सकाळी 10 वाजता खुलतात आणि लोक 10 वाजण्याची वाट बघत बसतात. पण आता बँकांच्या उघडण्याची वेळ बदलू शकते. असे झाले तर ग्राहकांना त्रास कमी होईल. ते ऑफिस जाण्याअगोदर त्यांचे बँकांचे काम करू शकतील. हे नवीन नियम सप्टेंबरपासून लागू होतील. जर हे नियम लागू झाले तर बँका सकाळी 9 वाजे पासून सुरू होतील.  
 
सकाळी 9 वाजता उघडतील बँका 
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या बँकिंग डिवीजनने सर्व सरकारी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांना सकाळी 9 वाजता उघडण्याचा प्रस्ताव दिला आहे.  
 
सोयींनुसार उघडायला पाहिजे बँका ब्रांच
जून महिन्यात बँकिंग डिवीजनची एक बैठक झाली होती ज्यात सोयीनुसार बँक ब्रांच उघडण्यास जोर देण्यात आला होता. ग्राहक सुविधांवर गाठीत उपसमितिच्या बैठकीत भारतीय बँकिंग असोसिएशन (IBA) ने बँकांच्या उघडण्याच्या टायमिंगबद्दल तीन प्रस्ताव दिले आहे. पहिला सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत, दुसरा सकाळी 10 ते संध्याकाळ 4 वाजेपर्यंत आणि तिसरा सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बँक आपल्या टाइमिंगबद्दल राज्य स्तरच्या बँकर्स कमिटीसोबत मिळून निर्णय घेऊ शकतो.  
 
सप्टेंबरपासून उघडणार आहे नवीन टायमिंगने बँक ब्रांच 
असे मानले जात आहे की बँक उघडण्याची वेळ सप्टेंबरपासून लागू होऊ शकतात. तसं तर अद्याप याची आधिकारिक घोषणा झालेली नाही आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख आयटीएम स्किल अ‍ॅकॅडमीला सर्वोत्कृष्ट कौशल्य विकास संस्था म्हणून जाहीर करण्यात आले