आठवड्याच्या शनिवारी सर्वांनाच बँकेची करयची सवय असते. परंतु आता तुम्हाला याच आठवड्यात बँकांची सर्व कामे उरकून घ्यावी लागणार आहेत. कारण तीन दिवस बँका बंद राहणार असून, पुढच्या आठवड्यातील शनिवारपासून बँकांना तीन दिवस सुट्टी आहेत. पुढच्या आठवड्यात 12 ते 14 जानेवारीपर्यंत बँका बंद राहणार आहेत. 12 जानेवारीला दुसरा शनिवार असून, बँकांना सुट्टी राहणार आहे. 13 जानेवारीला रविवारी असल्यानं बँका बंद राहतील. तर 14 जानेवारी सोमवारी मकरसंक्रांत/पोंगल सणानिमित्त बँकांना सुट्टी आहे. गोष्टी लक्षात घेतल्यास आपल्याला पैशांची चणचण भासेल तेव्हा आधीच तयारी केलेली बरे. दुसरीकडे संपावेळी फक्त सरकारी बँक बंद आहेत. खासगी बँका या सुरूच आहेत. त्यामुळे खासगी बँकांतून तुमचं खातं असल्यास तुम्हाला त्यातून व्यवहार करता येणार आहेत. कॅश काढताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला बँकेत जावं लागणार नाही. तसेच पेटीएम किंवा इतर पेमेंट ऍपचाही तुम्ही वापर करू शकता त्यामुळे आत्ताच पैसे जामा केले तर किंवा योग्य उपाय केले तर चनचन जनवनार नाही.