रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बँक ऑफ महाराष्ट्रला १ कोटींचा दंड ठोठावला आहे. आर्थिक घोटाळे शोधून काढण्यात आलेलं अपयश आणि त्याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेला ने दिल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला हा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत पत्राद्वारे बँक ऑफ महाराष्ट्रला कळवण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रसोबतच युनियन बँक ऑफ इंडीया आणि बँक ऑफ इंडीयालाही हा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने तमिळनाडू मर्कन्टाईल बँकेला ६ कोटींचा दंड ठोठावला होता.