भारतीय रिजर्व्ह बँके बँकेत काही आर्थिक गैरप्रकार आढळल्यावर कारवाई करते. अलीकडील दिवसांत आरबीआय ने कोल्हापुरातील एका नामांकित बँक शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड चा परवाना रद्द केल्याची बातमी आली होती. आता आरबीआय ने आणखी पाच बँकांवर कारवाई केली असून सीतापूर अर्बन को-ऑप बँकेचा परवाना रद्द केला असून प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, पाटण को ऑप बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक, राजर्षी साहू सहकारी बँकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
आरबीआयचे म्हणणे आहे की, राजर्षी शाहू बँकेत मिनियम बॅलेन्सच्या नियमांचे पालन केले गेले नाही. तर पाटणा को-ऑप बॅंकेत केव्हायसी नियमांचे उल्लंघन करण्यात आले तर शिक्षक सहकारी बँकेत गोल्डल लोनच्या संदर्भात काही तक्रारी आल्या आहेत. आरबीआय ने महाराष्ट्रातील या बँकेंना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.