Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीन दिवस बँका राहतील बंद!

तीन दिवस बँका राहतील बंद!
, शुक्रवार, 9 डिसेंबर 2016 (13:06 IST)
बँकांमध्ये शनिवारपासून ‍‍सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या असू शकतात. महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे 10 तारखेला बँका बंद राहतील. रविवारी साप्ताहिक अवकाश राहणार. याव्यतिरिक्त सोमवारी  ईद-ए-मिलाद सण असल्याने अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार.
नोटबंदीमुळे मागील एक महिन्यापासून बँकांमध्ये गर्दी जमत आहे. अशात सलग तीन सुट्यांमुळे बँकेचे काम असणार्‍यांसाठी समस्या वाढेल. साधारणपणे सुट्टीदरम्यान एटिएममध्ये रोख टाकली जात नाही.
 
पूर्वी दोन-तीन दिवसात रोख टाकण्याची गरज असायची परंतू नोटबंदीमुळे प्रत्येक एटिएम दिवसातून दोन-तीन वेळा तरी रिकामे होऊन जातं. तरी बाहेर वाट बघणार्‍यांची रांग कमी होतंच नाहीये. अशा परिस्थिती समस्या उद्भवू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुकवर बथर्ड इनविटेशन, 12 लाख लोकं म्हणाले- ''नक्की येऊ''