Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्याच्या अर्थसंकल्पात झाल्या मोठ्या घोषणा

राज्याच्या अर्थसंकल्पात झाल्या मोठ्या घोषणा
, सोमवार, 8 मार्च 2021 (16:07 IST)
महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत, यात 3 लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षासाठी 2 हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद आणि नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. 
 
अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा 
आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद
सरकारी रुग्णालयांत आग रोधक उपकरणे लावण्यात येतील.
सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
कोरोना काळात औद्योगिक काळात घट झाली, परंतू बळीराजाने तारले. शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्यासाठी शासन प्रयत्नात
शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना शून्य़ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार. व्याज राज्य सरकार भरणार
कर्जमुक्तीनंतर ४२ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं
कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १५०० कोटींचा महावितरणला निधी
विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी 
कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद 
जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटींचा निधी 
जलसंधारण विभागासाठी २ हजार ६० कोटींचा निधी प्रस्तावित 
गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी
ग्रामविकास विभागासाठी ७ हजार ३५० कोटींचा निधी प्रस्तावित
ईस्टर्न फ्री वे ला विलासराव देशमुख यांचे नाव
पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लागणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल
मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेले रेवस-रेडी मार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च अपेक्षित
निसर्ग चक्रीवादळ आणि राज्यातील आपत्ती पाहून महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तुकडी कायमस्वरुपी ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी
एसटी महामंडळासाठी १४०० कोटी रुपयांची घोषणा
पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर
नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार
ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार
अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार
महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार
आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी 11315 कोटी
समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे ला खुला करणार
नांदेड ते जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद 
राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, घर खरेदी करताना महिलेच्या नावाने घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार 
घरकुल योजनेसाठी 6800 कोटींची तरतूद करण्यात आली. यातून गरिबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल
जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी 3000 कोटींची तरतूद 
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना, 1500 हायब्रीड बस देणार, मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार  
शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांचा तमाम महिला वर्गाला महत्वाचा संदेश