कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी शेअर बाजारात भाजपला सुरुवातीत मिळालेल्या यशानंतर मोठी उसळी बघायला मिळत आहे. या दरम्यान सेन्सेक्स 408.93 अंक अर्थात 1.15 टक्के वाढून 35,965.64 वर निफ्टी 106.35 अंक अर्थात 0.98 टक्के वाढून 10,912.95 वर कारोबार करत आहे. आज गुंतवणूकदारांचे सर्व लक्ष्य कर्नाटक निवडणुकीच्या परिणामांवर राहणार आहे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी ७२ टक्के मतदान झाले होते. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपा 106, काँग्रेस 75, जनता दल (सेक्युलर) 38 जागांवर आघाडीवर आहे. हेच कल कायम राहिल्यास भाजपा कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल. परिणामी त्रिशंकू निकालांमुळे अस्थिरता निर्माण होणार नाही.
मिड-स्मॉलकॅप शेअरांमध्ये बढत
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरांवर बढत दिसत आहे. बीएसईचे मिडकॅप इंडेक्स 0.56 टक्के जेव्हा की निफ्टीचे मिडकॅप 100 इंडेक्स 0.72 टक्के वाढ आहे. बीएसईचे स्मॉलकॅप इंडेक्स 0.94 टक्के वाढला आहे.
बँक निफ्टीत वाढ
बँक, मेटल, ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये वाढ बघायला मिळत आहे. बँक निफ्टी इंडेक्स 478 अंक वाढून 26,940च्या स्तरावर कारोबार करत आहे. त्याशिवाय निफ्टी ऑटोमध्ये 0.40 टक्के, मेटलमध्ये 1.51 टक्के, निफ्टी फार्मामध्ये 0.59 टक्के उळसी बघायला मिळत आहे.
टॉप गेनर्स
पावर ग्रिड कॉर्प, एचयूएल, गेल, लुपिन, टेक महिंद्रा, टीसीएस, ओएनजीसी, एचडीएफसी
टॉप लूजर्स
एचपीसीएल, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, बीपीसीएल, बजाज ऑटो, एक्सिस बैंक, एसबीआई, मारुति सुजुकी