Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर सरकारी ४ जी आले, बी एस एन एलची सुरुवात केली सेवा

अखेर सरकारी ४ जी आले, बी एस एन एलची सुरुवात केली सेवा
, गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (08:03 IST)
अनेक दिवसांपासून सरकारी दूरसंचार कंपनी कडे ४ जी सुरु करा अशी मागणी करण्यात आली होती. आता ही सेवा भंडारा जिल्ह्यात नवरात्रीचा शुभ मुहूर्तावर भारतीय दूरसंचार निगमने ( बीएसएनएल ) ४ जी मोबाईलची सेवा सुरु केली आहे. याची सुरुवात आज भंडारा जिल्ह्यापासून करण्यात आली आहे.  राज्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात सर्वात प्रथम ४ जी सेवा सुरु करण्यात आल्या  आहेत, 
 
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी थ्रीजी सेवेच्या माध्यमातून २ ते ३ एमबी इतकी स्पीड दिला होता. त्यामुळें त्यामुळे स्पर्धेचा या युगात इतर मोबाईल कंपनी तर्फे देण्यात येणाऱ्या  ४ जी सेवेमुळे बीएसएनएल मागे खूप मागे  होती. मात्र, 4 जी सेवेमुळे स्पर्धेत वाढ होणार आहे हे स्पष्ट झाले असून देशात सर्वाधील यांचे टॉवर आहेत. खासदार मधुकर कुकडे यांचा हस्ते 4 जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात 4 जी सेवेसाठी १५७ टॉवर उभारण्यात आले असून त्यापैकी ११५ टावर सुरु आहेत. उर्वरित टॉवर येत्या काही दिवसातच सुरु होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन होंडा CRVचे अनावरण, बाजारात झाली दाखल