करोना विषाणूमुळे जगभरात मंदीचे वातावरण आहे. अशात काही दिवसांपासून भारतातही अनेकांना आपली नोकरी गमावावी लागली आहे. त्यातच आता टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) २० हजार कंत्राटी कामगारांना कामवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल कंपनीच्या कर्मचारी संघटनेनं याबाबतची माहिती दिली आहे. बीएसएनएलने याआधीच ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा निर्णय अशा वेळी घेतला गेला आहे जेव्हा या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही.
बीएसएनएलल कर्मचारी संघटनेने कंपनीचे अध्यक्ष वी के पुरवार यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कंपनीची हालत खूपच नाजूक असल्याचं सांगितलं आहे. शिवाय, ल्या १४ महिन्यापासून पगार दिला नाही. यामुळे १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. VRS योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना नियमीत वेळेत पगार दिला जात नाही. असेही सांगितलेय.