Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 28 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
 
अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूण 35 दिवसांचे असून 22 दिवस कामकाज चालणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल.  राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी दुपारी दोन वाजता सादर करण्यात येईल. या अधिवेशनात विधानसभेत एक विधेयक प्रलंबित तर विधान परिषदेत चार विधेयके प्रलंबित आहेत. याशिवाय चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतील. चार प्रस्तावित अध्यादेश आणि सहा प्रस्तावित विधेयकेही मांडण्यात येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा एकदा राम रथ यात्रा 25 लाखांचा रथ