पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँड योजना
, मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (09:14 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेली सॉवरेन गोल्ड बाँड योजनेला पुन्हा एकदा सोमवारपासून सुरुवात झाली. सरकारने सॉवरेन सोन्याचे रोखे खरेदी करण्यासाठी 2 हजार 987 रुपये प्रति ग्रॅम असा दर निश्चित केला आहे.
धनत्रयोदशीचा मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. याकडे पाहात पुन्हा योजना सुरु करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की, 16 ते 18 ऑक्टोबरच्या दरम्यान या योजनेत सोने खरेदी केल्यास त्याचा भाव 2 हजार 987 रुपये प्रति ग्रॅम एवढा असेल.
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेद्वारे पेपर गोल्डला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपोआपच ज्वेलरी, गोल्ड बार आणि गोल्ड कॉईनची थेट विक्री कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1 ग्रॅम ते 500 ग्रॅमपर्यंत सोने खरेदी करू शकता. हे बाँड भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सादर केले जातात. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे मान्यता असलेले पोस्ट ऑफिस आणि शेअर बाजार कंपन्यांच्या माध्यमातून तुम्ही हे बाँड खरेदी करू शकता.
पुढील लेख