Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉक्टर तुम्ही सुद्धा ...... ७ हजाराची लाच घेतांना डॉक्टरांना पकडले

डॉक्टर तुम्ही सुद्धा ...... ७ हजाराची लाच घेतांना डॉक्टरांना पकडले
, रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (10:09 IST)
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे महात्मा फुले जनधन योजनेत ऑपरेशन मोफत असतांना ऑपरेशनसाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश परदेशी आणि डॉ. महेश बूब यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
 
याबाबत माहिती अशी की,तक्रारदाराच्या मातोश्रीचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांना धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात डॉ. महेश परदेशी यांनी सात हजार रुपयांची लाच मागितली. यावेळी त्यांचे सहकारी डॉ.महेश बूब यांनी लाच मागण्यासाठी परदेशी यांना प्रोत्साहीत केले. त्यानुसार डॉ. परदेशी यांनी सदर लाचेची रक्कम पंचसाक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सव-2024; 24 व 25 फेब्रुवारी रोजी आयोजन