Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य रेल्वेने असा कमवला २.३२ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल

मध्य रेल्वेने असा कमवला २.३२ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:42 IST)
मध्य रेल्वेने २०२२ या वर्षात चित्रपटाच्या शूटिंगसाठी विविध ट्रेन्स आणि रेल्वे कोच ऑफर करून २.३२ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल प्राप्त केला आहे. हा महसूल गत वर्षातील कोणत्याही कॅलेंडर वर्षात मध्य रेल्वेला मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. ८ चित्रपट, ३ वेब सिरीज, एक डॉक्युमेंटरी, एक शॉर्ट फिल्म आणि जाहिरातीसह सुमारे १४ चित्रपटांचे चित्रीकरण मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी विविध चित्रपट निर्माते, प्रॉडक्शन हाऊसद्वारे करण्यात आले आहे.
 
मध्य रेल्वेने सर्वाधिक १.२७ कोटी रुपयांचा महसूल ‘२ ब्राइड्स’ या चित्रपटाद्वारे मिळवला आहे. ज्याचे येवला येथे चित्रीकरण करण्यात आले होते. कान्हेगाव स्थानकावर विशेष गाडीद्वारे १८ दिवसांच्या शूटिंग माध्यमातून तसेच आपटा रेल्वे स्थानकावर तीन दिवसांसाठी विशेष ट्रेनच्या शूटिंग द्वारे रु. २९.४० लाख महसूल प्राप्त केला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या एका कॅलेंडर वर्षात चित्रपटाच्या शूटिंगद्वारे मध्य रेल्वेने रुपये २.३२ कोटी केलेली कमाई ही, गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२१ च्या तुलनेत ( रु. १.१७ कोटी) ९९ टक्के एवढी जास्त आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे चित्रपट शूटिंग स्थान आहे. त्यामुळे सनफिस्ट मॉम्स मॅजिकच्या जाहिरात चित्रपटासह ५ चित्रपटांचे चित्रीकरण या युनेस्कोच्या जागतिक वारसा रेल्वे स्थानकावर करण्यात आले आहे. पनवेलजवळील आपटा स्टेशन, पुणे ते कोल्हापूर मार्गावरील वाठार स्टेशन, मुंबईकरांसाठी उन्हाळ्यात ‘माथेरान’, परळ येथील सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स अकॅडमी कॉम्प्लेक्स, दादर, कर्जत, जुनी वाडीबंदर ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत. तसेच अहमदनगरमधील येवला, मनमाड आणि कान्हेगाव स्टेशन, अहमदनगर आणि आष्टी दरम्यान नवीन विभागातील नारायण डोहो यासारखे यार्ड लोकप्रिये आहेत.
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खुशखबर, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय