Publish Date: Mon, 12 Dec 2016 (13:46 IST)
Updated Date: Mon, 12 Dec 2016 (13:47 IST)
यापुढे रेल्वे स्टेशन, हॉटेल, फूड मॉल अशा सर्व ठिकाणी शीतपेय छापील किमतीवरच विकावे लागणार आहेत. याबाबत वैधमापन विभागाने निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कूलिंग चार्जेसच्या नावाखाली विक्रेत्यांकडून एक किंवा दोन रुपये वाढीव आकारले जातात. आता दुकानदाराच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.