Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमर्शिअल एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला

कमर्शिअल एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला
, शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (10:12 IST)
छठ सणापूर्वी एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले आहेत. गुरुवार 16 नोव्हेंबरपासून सरकारी तेल कंपन्यांनी दिल्लीसह चार मोठ्या शहरांमध्ये कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट  केली आहे. या 19 किलोच्या सिलिंडरची किंमतीत घट 57.50 रुपये पर्यंत झाली आहे. 
 
आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर 1857.50 रुपयांऐवजी 1798.50 रुपयांना मिळणार आहे. तथापि, या आढाव्यात घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही घरगुती वापरासाठी 14.2 किलोचा सिलेंडर अवघ्या 906.50 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.
 
 केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती, सप्टेंबर महिन्यात सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही कपात केली होती. 
 




Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Assembly election 2023 : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मतदान