Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशात डेटा सेवादाता कंपनीत 'जिओ' पहिले

देशात डेटा सेवादाता कंपनीत 'जिओ' पहिले
, गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (08:44 IST)
रिलायन्स जिओ ही भारतातील प्रथम क्रमांकाची डेटा सेवादाता कंपनी बनली आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि बीएसएनएल या जुन्या कंपन्यांना जिओने मागे टाकले आहे.
 
दूरसंचार नियामक संस्था ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात ४९४ दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यात जिओचा वाटा सर्वाधिक ३७.७ टक्के आहे. मार्च २०१८ अखेरीस जिओची ग्राहक संख्या १८६.५ दशलक्ष होती. जिओची सेवा सप्टेंबर २0१६मध्ये सुरू झाली. ९0च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेल्या एअरटेलचा बाजार हिस्सा २३.५ टक्के आहे. एअरटेलची इंटरनेट सेवा ग्राहक संख्या ११६ दशलक्ष आहे. एअरटेलकडे २ जी ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. हे ग्राहक प्रामुख्याने बिगर-इंटरनेटचा फिचर फोन वापरतात. केवळ व्हॉईस कॉलसाठीच हे फोन वापरले जातात. विलीनीकरणाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांचा एकत्रित इंटरनेट बाजार हिस्साही जिओच्या खूपच मागे आहे. व्होडाफोनचा हिस्सा १५.४ टक्के (७६ दशलक्ष ग्राहक) आणि आयडियाचा ९.५ टक्के (४७ दशलक्ष ग्राहक) आहे. सरकारी मालकीच्या बीएसएनएलची उपस्थिती दिल्ली, मुंबई वगळता देशभर आहे. तरीही कंपनीचा बाजार हिस्सा अवघा ६.४ टक्के आहे. ३१.४ दशलक्ष ग्राहकांसह कंपनी इंटरनेट सेवेत पाचव्या स्थानी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताचा महिला हॉकी संघ फायनलमध्ये