धनत्रयोदशी दिवशी सोन्याची (Dhanteras 2021) खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. सोन्याची खरेदी करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर चांदीचा दर 0.23 टक्क्यांनी कमी झाला आहे.
मंगळवारी MCX वर डिसेंबर फ्युचर्स सोन्याचा भाव 81 रुपयांनी घसरून 47,822 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याचे भाव गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या उच्च पातळीच्या तुलनेत सुमारे 8,500 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले आहेत. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या पातळीवर गेला होता.
त्याचवेळी डिसेंबर वायदा चांदीचा भाव 162 रुपयांनी घसरून 64629 रुपये प्रति किलो झाला.
महामारी नियंत्रणात, सोन्याचे कमी भाव आणि जोरदार लग्नसराई यामुळे या वर्षी सण जोरात साजरा करण्याचा उत्साह दिसून येत आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांचा वाटा वार्षिक विक्रीच्या 40 टक्के असेल.
कोविड-19 ची तिसरी लाट ओसरण्याच्या भीतीने लोकांमध्ये सणासुदीचा उत्साह आहे तसेच यावेळी सोन्याच्या दरातही नरमाई आहे. अशा स्थितीत दागिन्यांची बाजारपेठ चमकदार राहण्याची अपेक्षा आहे.
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.