Exit Poll नंतर दुसर्‍या दिवसी देखील शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स 39000 च्या पार

रविवारी संध्याकाळी लोकसभा निवडणूक 2019 चे एक्झिट पोल आले आणि त्याचा प्रभाव शेअर बाजारावरही दिसून आला. दुसर्‍या दिवशी देखील शेअर बाजार तेजीसह उघडले. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 104.58 अंकांनी वाढून 39457.25 अंकावर उघडले. तसेच 28.80 अंकांनी वाढून निफ्टी 11857.10 पातळीवर उघडले.
 
तसेच शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी विक्रमी उसळी घेतली. त्याचबरोबर निफ्टीही वधारला. सेन्सेक्स १,४२१.९० अंकांनी वाढून ३९,३५२.६७ अंकावर बंद झाला. तर निफ्टी ४२१ अंकांनी वाढून ११,८२८ वर पोहचला. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सेन्सेक्सने गाठलेली ही सर्वोच्च पातळी होती..

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख लोकसभा मतदान पूर्ण संपले आता पेट्रोल, डीझेल नंतर दुधाचे दर वाढले जाणून घ्या किती ?