दाम दुप्पट पैसे देवू या प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे घेवून फसवणुकीची घटना उघड झाली असून, कोट्यावधीचा घोटाळा बाहेर येणार आहे.
पुण्यातील प्रसिद्ध फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीने लाखोंच्या गुंतवणुकीवर विविध योजनांद्वारे दरमहा जादा व्याजाच्या रूपात कायम हप्ते देण्याच्या नावाखाली नाशिकसह राज्यातील शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या कंपनीच्या संचालकांविरोधात अखेर आज मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये दिलेल्या तक्रारी नुसार फडणीस कंपनीचे संचालक विनायक प्रभाकर फडणीस, अनुराधा विनय फडणीस, शरयू विनायक ठकार, भाग्यश्री सचिन गुरव, सायली विनय फडणीस-गडकरी, मनोज ऊर्फ तुषार बापूराव कुलकर्णी (सर्व रा. प्रसिडेन्स हाईटस्, गडकरी, श्रीहरी कुटे मार्ग नाशिक) अशी संचालकांची नावे आहेत. तर पोलिसांच्या आर्थिक गुन्हा प्रतिबंध शाखेने राज्यातील गुंतवणूकदारांना आवाहन करत असून तक्रार करा असे सांगितले आहे.