अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारी बेंगलोर येथील INS या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक संशोधन करत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकर्यांना फायदा कसा होईल यासाठी आज लातूर जिल्ह्यातील लोदगा येथील सर छोटुराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ड्रोनद्वारे पिकांची पाहणी कशी करता येईल याची प्रात्यक्षिके आज डॉ. के.पी.जे रेड्डी यांच्या टिमने करून दाखवली. यावेळी एकूण पाच प्रकारच्या ड्रोनची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. शेतीमध्ये ड्रोनतंत्रज्ञनाचा वापर करण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत असल्याचे रेड्डी म्हणाले. शेतकर्यांना या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांवर येणार्या प्रादुर्भावाची पूर्व कल्पनाही देता येणार आहे. तसेच शेतकर्यांचा पिकांची पाहणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही यामुळे शक्य आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी वेगवेगळ्या नैसर्गीक आपत्तींना सामोरे जातॊ आहे पण त्यांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नाही त्याचे कारण म्हणजे पिकांची पाहणी करण्यास अधिकारी करत असलेली दिरंगाई होय. या ड्रोनमुळे काही तासातच पिकांचा सर्व्हे करता. शेती करण्यासाठी लागणारा वेळ ही या मार्फत कमी करणे शक्य होणार आहे. पिकांची फवारणी करणे, पिकावर कोणत्या स्वरुपाचा रोग पडला आहे याचे परिक्षण करून त्यावर योग्य तो उपाय करणे यामुळे शक्य होणार असल्याचे पाशा पटेलांनी सांगितले. यावेळी बहुसंख्य प्रमाणात शेतकरी व आजुबाजुच्या गावांमधील शाळकरी मुले उपस्थित होते. उपस्थित शेतकर्यांनी शास्त्रज्ञांचा सत्कारही केला.