एचडीएफसीच्या सॅलरी अकाऊण्टमधून पैसे काढण्याला आतापर्यंत कोणतीही बंधनं नव्हती. मात्र यापुढे खात्यातले पैसे एटीएममधून काढताना दर महिन्याला फक्त पहिली चार ट्रँझॅक्शन मोफत असतील. त्यानंतर पाचव्या ट्रँझॅक्शनला तब्बल दीडशे रुपये आकारले जाणार आहेत. या 150 रुपयांव्यतिरिक्त कर आणि सेस लागू होईल. म्हणजे शंभर रुपये काढायचे असतील तरी तुम्हाला त्याव्यतिरिक्त 150 रुपयांपेक्षा जास्त रक्कम फी म्हणून द्यावी लागेल. 1 मार्च 2017 पासून हा निर्णय लागू होणार असून नोकरदारांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली आहे. दुसरीकडे एसबी मॅक्स ग्राहकांना सॅलरी खात्यातले पैसे एटीएममधून काढताना दर महिन्याला पहिली पाच ट्रँझॅक्शन मोफत असतील. त्यानंतर सहाव्या ट्रँझॅक्शनला दीडशे रुपये आकारले जातील. या 150 रुपयांव्यतिरिक्त कर आणि सेस लागू होईल.