अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रुपये वाढ झाली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर (एलपीजी) 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. या बरोबरच विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 14.50 रुपयांची कपात केली असल्यानं आता 737.50 रुपयांऐवजी 723 रुपये मोजावे लागणार आहेत. तर अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 5.57 रुपयांची वाढ केल्यानं आता त्यासाठी 440.05 रुपये मोजावे लागणार आहेत.