Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'गो एअर' ऑफर : 312 रूपयांमध्ये विमान प्रवास

'गो एअर' ऑफर : 312 रूपयांमध्ये विमान प्रवास
नववर्षाचं सेलिब्रेशन आणि तुमचा सुट्ट्यांच्या प्लॅनसाठी  'गो एअर' ची खास ऑफर  आहे. 'गो एअर' ने  लिमिटेड कालावधीसाठी एक खास ऑफर घोषित केली आहे. यानुसार अवघ्या ३१२ रूपयांमध्ये विमानाचा वन वे प्रवास करणं शक्य होणार आहे. 
 
दिल्ली, कोची, बंगळूरू,हैदराबाद,चैन्नई,अहमदाबाद, लखनऊ अशा सात शहरांसाठी उपलब्ध आहे. मात्र या ऑफरमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रथम येणार्‍यास प्राधान्य यानुसार प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहेत. 
 
गो एअरची ही ऑफर १ डिसेंबर ते २८ ऑक्टोबर २०१८ या दिवसांदरम्यान प्रवास करणार्‍यांसाठी उपलब्ध होणार आहे. तर या तिकिटांची बुकिंग २९ नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहेत. गो एअरने घोषित केलेल्या विमानाच्या तिकीटाच्या दरामध्ये टॅक्सचा समावेश नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' नोटा बँकांनी स्वीकारणं बंधनकारक