Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीत सोने 1750ने गडगडले

gold
तब्बल 16 दिवसानंतर सोने चांदी बाजार सुरू झाल्यानंतर सोमवारी सोने प्रति 10 ग्रॅमला 1750 रुपयांनी गडगडले व भाव 29440 रुपये झाला. चांदीच्या भावात प्रति किलो 3100 रुपयाची घसरण झाली. चांदीचे भाव 41,600 रुपये किलो होते. 11 नोव्हेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने सोने चांदी व्यापार्‍यांची चौकशी सुरू केल्यानंतर सोने व चांदी दागिन्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दिल्ली एनसीआर, दरीबा कलान, चादनी चौक व करोल बाग भागातील सोने चांदी व्यापार्‍यांकडे प्राप्तिकर अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पर्सन ऑफ द इयर यादीत मोदी आघाडीवर