Publish Date: Wed, 23 Aug 2017 (11:49 IST)
Updated Date: Wed, 23 Aug 2017 (12:05 IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण होत असताना दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा १५० रुपयांनी घसरले. मंगळवारी सोन्याच्या दरात घट होत ते प्रतितोळा २९,८०० रुपयांवर पोहोचले.
स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घट झाली. सोन्यासह मंगळवारी चांदीचे दरही कमी झाले. चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण होत ते प्रतिकिलो ३९,९००वर पोहोचले. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.