rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा एकदा सोनं-चांदी महागले

Gold
, सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (09:13 IST)
परदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ आल्याने स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात लागोपाठी दुसऱ्या आठवड्यात ही वाढ पाहायला मिळाली. सोनं 30 रुपयांनी महागलं आहे. सोन्याचा भाव 31,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकडे चांदी देखील 650 रुपयांनी महागली असून 38,150 रुपये प्रति किलो झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय  बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,198.70 डॉलर प्रति औंस झालं आहे. तर चांदी 14.25 डॉलर प्रति औंस झाली आहे. सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढल्याने देखील ही वाढ पाहायला मिळाली आहे.
 
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 99.9 टक्के 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रमे 31,700 रुपये आणि 31,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. दुसरीकडे तयार चांदी देखील 650 रुपयांनी महागली आहे. चांदी 38,150 रुपए प्रति किलो झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार