Publish Date: Sat, 03 Jun 2017 (11:42 IST)
Updated Date: Sat, 03 Jun 2017 (11:44 IST)
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति ग्रॅम 29,350 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचे दर 850 रुपयांनी घसरत प्रतिकिलो 39300 रुपयांवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 3.80 डॉलरच्या घसरणीसह 1,261.75 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.