Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोने आयातीत 40 टक्क्यांची घसरण

सोने आयातीत 40 टक्क्यांची घसरण
नवी दिल्ली , सोमवार, 21 डिसेंबर 2020 (11:15 IST)
भारत सोच्याचा सर्वात मोठा आयात देश आहे. कोरोनामुळे सोन्याच्या आयातीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. चालू वित्तीय वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची झाली असून ती 12.3 अब्ज डॉलरवर आली आहे.
 
सोने आयातीचा परिणाम देशाच्या चालू खात्याच्या तुटीवर पडतो. वाणिज्य मंत्रालयाच्या 2019-20 वर्षाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारतात 20.6 अब्ज डॉलर इतक्या किमतीचे सोने आयात करण्यात आले होते. त्यात आता 40 टक्क्यांची घट होऊन ते 12.3 अब्ज  डॉलरवर आले आहे. चांदीच्या आयातीतही एप्रिल ते नोव्हेंबर यादरम्यान 65.7 टक्क्यांची  घसरण झाली असून ती 75.2 करोड डॉलर इतकी झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नव्या स्टेनचा ब्रिटनमध्ये उद्रेक; विमानसेवा तात्पुरती स्थगित : 30 डिसेंबरर्पंत पुन्हा लॉकडाउन