Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gold Price Today: सोन्या चांदीच्या किमतीत घट, जाणून घ्या नवे दर

webdunia
, शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (16:35 IST)
भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घट दिसून आली. सोन्याचा भाव 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात किलोमागे 68 हजार रुपयांची घट झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55,584 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 67591 रुपये आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव गुरुवारी संध्याकाळी 55,796 रुपये प्रति 10 ग्रॅम होता,आज सकाळी 55,584 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.  
 
 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 55,361 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याच वेळी 916 शुद्धतेचे सोने आज 50,915 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 41688 रुपयांवर आला आहे.  585 शुद्धता असलेले सोने आज 32517 रुपयांवर आले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 67591 रुपये झाला आहे. 

Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Amruta Fadnavis New Song Release: अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज