Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोन्याचे भाव घसरले

सोन्याचे भाव घसरले
, शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (16:21 IST)
आंतरराष्ट्रीय बाजारातून घसरणीचे संकेत मिळाल्यानंतर शुक्रवारी सोन्याच्या किंमती वायदे बाजारात ११२ रुपयांनी कोसळल्या. सोनं ३१,३०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर येऊन पोहचलं. एमसीएक्सवर डिसेंबर करारासाठी सोन्याचा वायदे भाव ११२ रुपये म्हणजेच ०.३६ टक्क्यांनी घटले. यासाठी ४०९ लॉटचा व्यापार पार पडला. या पद्धतीनंच फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी २२ व्या लॉटच्या व्यापारात सोन्याचा वायदे भाव ११२ रुपयांनी घसरून ३१,५३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव १,१९९.४० डॉलर प्रति औंसवर राहिला.
 
याच पद्धतीनं चांदीचे भावही वायदे बाजारात ११३ रुपयांनी घटले. चांदी ३८,८५८ रुपये प्रति किलोग्रॅमवर येऊन पोहचली. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर ७९०च्या लॉटमध्ये डिसेंबरसाठी चांदी ३८,८५८ रुपये प्रति किलोग्रॅम राहिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लंडनमध्ये चक्क शाकाहारी मच्छी