Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीर्घकाळात सोन्याच्या किंमती रु. ६५०००-६७००० / १० ग्रॅमपर्यंत वाढण्याची अपेक्षाः मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

दीर्घकाळात सोन्याच्या किंमती रु. ६५०००-६७००० / १० ग्रॅमपर्यंत वाढण्याची अपेक्षाः मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस
, शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:15 IST)
कमोडिटी इनसाइटः गोल्ड क्रॅकर्स दिस दिवाली या अहवालानुसार मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ने रु. ४९,५००-४८,५०० च्या दिशेने प्रत्येक घसरण सह सोन्याचे साठा करण्याची शिफारस केली आहे, जे रु. ५२,००० - ५३,००० च्या सुमारे कॅप्ड असलेल्या शॉर्ट टर्म अपसाईड सहित  खरेदी करण्यासाठी चांगली रेंज आहे. कॉमेक्स गोल्ड १८८०-१८४० डॉलरच्या आसपास आधार तयार करणे अपेक्षित आहे, तर रॅली १९४०-१९७५ डॉलरच्या रेंजमध्ये कॅप्ड राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कॉमेक्सवर २५०० डॉलर आणि डोमेस्टिक फ्रंटवर रु. ६५०००-६७००० चे उद्दिष्ट राखते.
 
गेल्या दशकात, भारतातील सोन्याने १५९% परतावा दिला आहे आणि वर्षानुवर्षेच्या आधारावर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. डब्ल्यूजीसीच्या मते, चौथ्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी मागील तिमाहीत 30% घसरल्यानंतर पुनरुत्थान होणे अपेक्षित आहे कारण उत्सव किरकोळ दागिन्यांची खरेदी बळकट करण्याची अपेक्षा आहे. भारतातील मौल्यवान धातूची मागणी सामान्यतः वर्षाच्या अखेरीस वाढते कारण लग्नासाठी आणि दिवाळी व दसरा अशा प्रमुख सण-उत्सवांसाठी सोनं विकत घेणे शुभ मानले जाते.
 
या वर्षी एक महत्त्वपूर्ण प्राईस रॅली पहिली गेली जी बाजारात असणारी अनिश्चितता, महामारीचा परिणाम आणि रुपयाची घसरण या बाबींमुळे घडली. अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर येणारे काही महिने सोन्याच्या अल्प ते मध्यम मुदतीच्या प्रक्षेपणाची व्याख्या करण्यासाठी खूप महत्वाचे असेल. सेंट्रल बँकांची भूमिका, कमी व्याज दर आणि उत्पन्न, बाजारातील अत्याधिक तरलतेचा वाढता प्रभाव, महामारीचा परिणाम आणि इतर समस्या दीर्घकाळात गोल्ड रॅलीसाठी एक परिपूर्ण चित्र निश्चित करू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली