जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 140 रुपयांनी वाढ झाली. चांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 320 रुपयाची वाढ झाली.
दिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 140 रुपयांनी वाढून 31350 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 140 रुपयांनी वाढून 31500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर 490 रुपयांनी कमी झाले होते. शनिवारी तयार चांदीचे दर 320 रुपयांनी वाढून 39530 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.43 टक्क्यांनी तर चांदीचे दर 0.27 टक्क्यांनी वाढले.