Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोने, चांदी दरात तेजी

सोने, चांदी दरात तेजी
, शनिवार, 16 जून 2018 (09:22 IST)
जागतिक बाजारात आलेले तेजी आणि सोने खरेदीसाठी सराफा व्यापाऱ्यांकडून आलेला प्रतिसाद पाहता सोने दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी सोने प्रति तोळा अर्थात १० ग्रॅमचा दर ३३० रुपयांनी वाढून ३२,१९० रुपयांवर पोहोचला. गेल्या १५ दिवसांत सोने दरात तेजी पाहायला मिळाली. तर चांदी दरातही वाढ पाहायला मिळाली. चांदी दरात ४५० रुपयांनी वाढ झाले. किलोला चांदीचा दर ४२ हजार ४०० रुपये पाहायला मिळाला.
 

चांदीची किंमत वाढीसाठी अमेरिका आणि चीनमधील व्यापारात झालेली वाढ कारणीभूत आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या भावात झालेली घसरणीमुळे सोने बाजारात अधिक मजबुतपणा आला. तसेच स्थानिक बाजारातही सोनेच्या मागणीत वाढ झाली. तसेच जागतिक पातळीवर सोने दरात तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये ०.२४ टक्के सोने दरात वाढ झाली. १३०१.९० प्रति औंस डॉलर सोने दर होता. तर चांदीमध्ये ०.७४ टक्के वाढ होवून १७.१३ डॉलर प्रति औंस दर राहिला.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाईन स्मार्टफोन विक्री जोरात, सुमारे ३८ टक्के वाढ