Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांगली बातमी :सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदी स्वस्त झाले,सोने 47 हजार आणि चांदी 64 हजार रुपयांच्या खाली आली

चांगली बातमी :सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदी स्वस्त झाले,सोने 47 हजार आणि चांदी 64 हजार रुपयांच्या खाली आली
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (13:05 IST)
सोने -चांदीच्या किमतीत सतत घसरण होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सराफा बाजारात सोने 182 रुपयांनी कमी होऊन 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. वायदे बाजाराबद्दल बोलायचे झाले तर,  MCX वर 127 रुपयांच्या घसरणीसह सोने 46,911 रुपयांवर व्यवहार करत आहे.
 
सराफा बाजारात चांदी 1,100 रुपयांहून अधिक स्वस्त झाली,आज चांदी 1,148 रुपयांनी स्वस्त झाली आहे.चांदीची किंमत  63,362 रुपये प्रति किलो असून  MCX वर, 309 रुपयांनी कमी होऊन 63,874 रुपयांवर व्यवहार करत आहे.
 
या आठवड्यातसोने 563 रुपयांनी स्वस्त झाले सराफा बाजारात, या आठवड्यात आतापर्यंत सोन्यात 563 रुपयांची घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, सोने 47,573 रुपयांवर होते जे आता 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, जेव्हा चांदी  या आठवड्यात 1,754 रुपयांनी स्वस्त झाली असून  63,362 रुपये प्रति किलो आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Road Accident :पालघरमध्ये भीषण बस अपघातात 50 प्रवासी जखमी