वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचं बजेट कोलमडलेले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांचे हाल होत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. खाद्य मंत्रालयाने बुधवारी घेतलेल्या खाद्यतेल कंपन्यांच्या बैठकीनंतर खाद्यतेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीत सर्व तेल कंपन्या सहभागी झाल्या होत्या.या बैठकीत खाद्यतेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सरकारने एमआरपी मध्ये बदल करण्याचा सूचना कंपन्यांना दिल्या होत्या.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार आगामी काळात दरात आणखी कपात होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत प्रति लिटर 20 रुपयांनी दर कमी होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरल्यानंतर देशांतर्गत बाजारात दर घसरण्याची शक्यता आहे. सरकारने तेल कंपन्यांना एमआरपी मध्ये कमी झालेल्या किमती नमूद करण्यास सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या आहेत. अशा परिस्थिती याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा अशी सरकारची इच्छा आहे.तेलाच्या किमतीत 20 रुपयांची कपात केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देशभरात शेंगदाणा तेल वगळता पॅकेज केलेल्या खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीत 15-20 रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्याच्या किमतीत 150 ते 190 रुपये किलोपर्यंत घसरण आली होती. आता त्यात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी हा दर 200 रुपयांच्या पुढे गेला होता.तेलाच्या किमतीत 20 रुपयांची कपात केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या वेळी बैठकीत खाद्य विभागाचे सचिव सुधांशु पांडे हे उपस्थित होते.