Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदाची बातमी ! गव्हाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय,आता सरकार विकणार पीठ!

आनंदाची बातमी !  गव्हाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय,आता सरकार विकणार पीठ!
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (17:37 IST)
गेल्या काही वर्षांपासून देशात महागाई भस्मासुरासारखी वाढत आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. याचा परिणाम इतरही वस्तूंच्या महागाईवर होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देशात सातत्याने वाढत आहेत. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. या महागाईच्या  पगार देखील पुरात नाही.वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे हाल होत आहे. 
 
सामान्य नागरिकांसाठी केंद्र केंद्र सरकारने गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या केंद्र सरकार कडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत केंद्र सरकार कडून 81.35  कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. मोफत रेशन 31 डिसेंबर पर्यंत मिळणार असे सरकारने सांगितले होते. आता ही तारीख जवळ येणार असून त्यापूर्वी सरकार बाजारात स्वस्तात गव्हाचं पीठ उपलब्ध करण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतीमुळे सरकार ने स्वस्तात गव्हाचं पीठ देण्याचं ठरवत आहे. एका अहवालात सरकार भारत ब्रॅण्डच्या अंतर्गत गव्हाचं पीठ 27.5  रुपये किलोच्या दराने विकण्याचे  समोर आले आहे. 

पिठाची विक्री कधी पासून होणार- 
येत्या 7 नोव्हेंबर पासून पिठाची विक्री सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या बाजारपेठेत मिळणाऱ्या ब्रँडेड गव्हाच्या पिठाची किंमत 35 ते 40 रुपये आहे. 

सध्या मध्यप्रदेशात गव्हाच्या पिठाचे दर 45 रुपये किलो आहे. तर साधारण गव्हाच्या पिठाचे 10 किलोचे दर 370 रुपये आहे. आता भारत ब्रँड चे गव्हाचे पीठ रुपये 275 ला मिळणार आहे. हे गव्हाचे पीठ 10 किलो आणि 30 किलोच्या पॅक मध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. या बाबतीत हा निर्णय शासनाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. या साठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाला नोडल एजन्सी बनवण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  
 










Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षर पटेल-ऋषभ पंत विश्वचषकादरम्यान तिरुपती बालाजीच्या दर्शनाला